मोठ्या बहिणीने प्रेमास नकार दिल्याने ‘त्याची’ सटकली …छोट्या बहिणीसोबत केले असे काही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 :  प्रेमाला नकार दिलाच्या रागातून एका युवकाने प्रेयसीच्या थेट घरात घुसून तिच्या लहान चुलूत बहिणीवर चाकूने वार केले. या हल्ल्यात ही मुलगी जबर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

गिडेगांव येथे आठ दिवसांपूर्वी ही घटना घडली. याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी गेलेल्या मुलीच्या वडिलांनाच पोलिसांनी मारहाण केली. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण गावातून पोलिसांच्या कृत्याचा निषेध व्यक्त होत आहे.

नेवासा तालूक्यातील गिडेगांव येथील इयत्ता बारावीत शिक्षण घेत आसलेल्या एका विद्यार्थीनीला गावातीलच एका युवकाने प्रेमाची मागणी घातली होती. मात्र या महाविद्यालयिन युवतीने या युवकाला नकार दिला.

त्यानंतर या मुलाने अनेक वेळा या मुलीचा पाठलाग पुरवून छेडछाड केली. मात्र मुलीचा ठाम नकार असल्याने या युवकाने ‘तुला जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकी दिली होती. तरीही या युवतीने त्याला नकार दिला.

आपल्या प्रेमाला नकार दिल्याचा राग मनात धरून या युवकाने थेट युवतीचे घर गाठले. मात्र, त्यावेळी ही मुलगी शेतात कामासाठी गेली होती. त्यामुळे घरात असलेल्या तिच्या 12 वर्षाच्या चुलत लहान बहिणीवर चाकूने सपासप वार करून पसार झाला.

दरम्यान, ही घटनेनंतर मुलीच्या घरच्यांनी जखमी झालेल्या बहिणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, प्रेयसीच्या वडिलांनी मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता

पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्याऐवजी उलट तिच्या वडिलांनाच मारहाण केली. पोलिसांच्या या कृत्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment