राहुरी :- एसटी बसस्थानकावरील शौचालयात गेलेल्या प्रवासी महिलेकडे खिडकीतून डोकावून पाहणाऱ्या अरबाज शेख (राहुरी) या तरूणाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मुंंबई येथील ही महिला बसस्थानकावरील शौचालयात गेल्यानंतर पाठीमागच्या खिडकीतून अरबाज शेख हा मोबाइल हातात घेऊन डोकावत असल्याचे दिसले.
या महिलेने बाहेर येऊन अन्य प्रवाशांना हा प्रकार सांगताच त्यांनी संबंधित तरूणाला रंगेहात पकडून लाथाबुक्क्यांनी तुडवत चोप दिला.
ही खबर मिळताच फौजदार डी. बी. जाधव यांनी बसस्थानकावर जाऊन शेख यास ताब्यात घेतले. या घटनेबाबत पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर शेख विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
अरबाज हा बसस्थानकावर खाद्यपदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेणे, खिसे कापणे, अनोळखी प्रवाशांना हेरून मारहाण करत पैसे काढून घेणाऱ्या भामट्यांबरोबरच
शाळकरी मुलींची छेडछाड करणाऱ्या टवाळखोरांची संख्या राहुरीच्या बसस्थानकावर वाढल्याने हे स्थानक संपूर्ण जिल्ह्यात बदनाम झाले आहे.
- जन्मतारखेनुसार पर्समध्ये ठेवा ‘या’ गोष्टी…पैसा आणि भाग्य तुमच्याकडे ओढून येईल!
- नागरिकांना उगाच चकरा मारायला लावू नका, कागदपत्रे पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्या, आमदार काळेंच्या सूचना
- संगमनेर तालुक्यात एमआयडीसी सुरू करणारच, आमदार अमोल खताळांचा ठाम निर्धार
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकणार, शिर्डीतील भाजप मेळाव्यात पालकमंत्री विखेंचे प्रतिपादन
- थायलंड-कंबोडियात भारतीय रुपयाची किंमत जाणून लगेच ट्रीपचा प्लॅन कराल, आकडे ऐकून विश्वास बसणार नाही!