अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पारनेर नगर पंचायतीमधील शिवसेनेच्या काही नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत
याबबत नगरपंचायतीमधील नगरसेवकांना पारनेर शहरातील विकास करायचा असून तो विकास राष्ट्रवादीच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास त्यांना वाटल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असा दावा आ. निलेश लंके यांनी केला होता.
आ. लंके यांचा हा दावा शिवसैनिकांनी खोडून काढला आहे. आ. लंके यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकास साध्यच करायचा असेल तर त्यांनी आधी त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीत प्रवेश द्यावा असे आव्हान शिवसैनिकांनी दिले आहे.
पारनेर शहरातील त्या नगरसेवकांना शहरात विकास हवा होता म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असे म्हटले जात असेल तर सुपा- वाडेगव्हाण जिल्हापरिषद गटातील जनतेला शिवसेनेच्याच माध्यमातून विकास होऊ शकतो
याची जाणिव स्वत: निलेश लंके यांना झाली असल्यानेच त्यांनी आपल्या सौभाग्यवती शिवसेनेत ठेवल्या असल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews