अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील पावभाजी विक्रेत्याला कोरोनाची बाधा झाली. बाळंत झालेली पत्नी व मुलाला आणण्यासाठी तो मुंबईला गेला होता.
परत आल्यावर त्याला त्रास होऊ लागला. सुरुवातीला मांजरी येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले. नंतर मांजरी आरोग्य केंद्रातून नगर येथील रुग्णालयात त्याला पाठवण्यात आले.
तेथे तपासल्यावर कोरोना बाधा झाल्याचा अहवाल आला. सोमवारी सायंकाळी तहसीलदार फैसियोद्दीन शेख, वैद्यकीय अधिकारी डाॅ. नलिनी विखे,
गटविकास अधिकारी गोविंद खामकर, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी टाळेबंदी प्रखर करत संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन केले. गाव सील केल्याचे पोलिस पाटील अनिल काळे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews