संगमनेर : शहरातील नाशिक-पुणे महामार्गावरील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षकास मारहाण झाल्याची घटना
सोमवार दि. १ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोरक्षनाथ नामदेव पानसरे हे थोरात महाविद्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून काम पाहतात.
सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पानसरे, प्रा. डॉ. सुहास आव्हाड, प्रा. डॉ. दिलीप पोखरकर, असे तिघे पानसरे यांच्या कक्षात कार्यालयीन कामकाज करत होते.
त्यावेळी शरद थोरात व त्याचा मुलगा अभिषेक हे दोघे तेथे आले. शरद थोरात याने पानसरे यांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात झालेल्या प्राध्यापक भरतीच्या मुलाखतीची माहिती मागितली.
पानसरे यांनी ही माहिती संस्थेकडे असल्याचे त्याला सांगितले. याचा राग आल्याने शरद याने पानसरे यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.
त्यावेळी तेथे असलेल्या प्राध्यापकांनी थोरात याला बाजूला नेले. या मारहाणीत पानसरे यांचा चष्मा फुटला असून त्यांना दुखापत झाली आहे.
या प्रकरणी गोरक्षनाथ नामदेव पानसरे (वय ५३, रा. ओम साई कॉलनी, मालदाड रस्ता, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी शरद नाना थोरात (रा. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- BSF Sports Quota Jobs 2025: सीमा सुरक्षा दलात 241 जागांसाठी भरती सुरू! लगेच अर्ज करा
- ‘या’ आहेत 2025 मधील भारतातील सर्वाधिक स्वस्त टॉप 5 कार ! यादीतली सर्वात स्वस्त कार फक्त 4.23 लाखांना, पहा संपूर्ण यादी….
- मार्केट कॅपिटलनुसार भारतातील सर्वाधिक मोठ्या टॉप 10 कंपन्या ! पहिल्या नंबरवर कोण ? पहा संपूर्ण यादी
- महाराष्ट्रातील 1ली ते 10वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ऑगस्ट महिन्यात राज्यातील शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या राहणार
- पंतप्रधान मोदीनी मन की बात मधून ऐतिहसिक घटनेचा आनंद द्विगुणीत केला-ना.विखे पाटील