अहमदनगर ब्रेकिंग : कांद्याने घेतला शेतकऱ्याचा बळी

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने नागापूर येथील गणेश निंबोरे या तरूण शेतकऱ्याने आर्थिक विवंचनेतून आज गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना मंगळवार दि.७ रोजी उघडकीस आली. नागापूर येथील गणेश चंद्रकांत निंबोरे या तरूण अल्पभूधारक शेतकऱ्याला काही दिवसापूर्वी कांद्याने दगा दिला होता,

बाजारात नेलेल्या कांद्याला दोन ते तीन रुपये भाव मिळाल्याने गणेश निंबोरे हा गेली काही दिवस आर्थिक विवंचेनेमुळे टेन्शन मध्ये होता,

घरची परिस्थिती हलाकीची, आईचे सततचे आजारपण, घरात तीन मुली अशा सर्व बाजूंनी अडचणी समोर दिसणाऱ्या या शेतकऱ्याने

अखेरीस मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment