अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.
मार्केटयार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, अंकुश मोहिते, रोहित केदारे, संतोष लोखंडे, महेश आठवले आदि उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी काही अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करण्यात आली. घडलेला प्रकार अत्यंत वाईट असून, या घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशा समाजकंटकांना वेळीच पायबंद करण्यासाठी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान हे या भारत देशाची अस्मिता आहे. प्रत्येकाचा माथा सन्मानाने ठेवावा अशा महामानवाच्या पवित्र स्थळाचे विटंबना करणार्या व्यक्तीला लवकरात लवकर जेरबंद करावे व या घटनेमागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews