अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडल्याप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला दुकानदाराने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शेवगावमधील चापडगाव येथे घडला.
कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
यासाठी प्रशासनाने अनेक नियम बनविले आहेत. परंतु अनेक लोक बेफिकिरीने वागताना दिसतात. यासाठी मास्क न वापरणारे, तसेच नियमबाह्य दुकाने सुरू ठेवणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
या मारहाण प्रकरणी रात्री उशिरा शेवगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिलकुमार रामनाथ चांडक (रा.चापडगाव) असे दुकानदाराचे नाव आहे. चापडगाव येथील अनिलकुमार चांडक यांचे ग्रामपंचायत गाळ्यातील कपड्याचे दुकान सुरू होते.
येथे काही जणांनी तोंडाला मास्क लावला नसल्याचे आढळले. त्यामुळे त्यांच्या दुकानात ग्रामपंचायतचे कर्मचारी अशोक पातकळ हे गेले व त्यांनी दुकान चालू असल्याने दंडाची पावती फाडावी लागेल, असे सांगितले.
त्यामुळे चांडक यांनी पातकळ यांना शिवीगाळ करीत त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच त्यांच्या हातातील पावती पुस्तक फेकून दिले.
या प्रकरणी अशोक पातकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिलकुमार चांडक यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews