अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे त्यांच्या परिवारासह कार्यकर्त्याचा जीव भांड्यात पडला आहे.
राज्याचे महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईच्या शासकीय निवासस्थानी असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची बाधा झाली होती.
त्यानंतर एक दक्षता म्हणून ना. थोरात यांनी स्वत:हून होमक्वारंटाईन करून घेतले होते. दरम्यान त्यांचा स्वॅब घेऊन चाचणी करण्यात आली होती.
त्याचा अहवाल आरोग्य प्रशासनाला मिळाला असून तो निगेटीव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, संगमनेरात राजकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews