पारनेर नगरसेवकांबद्दल अजित पवारांचा गौप्यस्फोट ! म्हणाले निलेश लंके यांनी….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : पारनेरच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली,या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. पक्षप्रवेशानंतर ते नगरसेवक सेनेचे असल्याचं समजलं, असे स्पष्टीकरणच अजितदादांनी दिले आहे.

अजित पवार यांना आज पारनेरमधील पाच नगरसेवकांच्या प्रवेशासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. “मी त्या दिवशी बारामतीत होतो. गर्दीत मी सगळ्यांना सांगत होतो, काळजी घ्या. तेव्हा काही वाहनं आली.

तिथे आमदार निलेश लंके आले. मी त्यांना विचारलं की, काय काम आहे, तर ते मला म्हणाले की, काही अपक्ष नगरसेवक आहेत, त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे.

मी बाहेर आलो, त्यांच्या गळ्यात गमछे टाकले. कार्यक्रम झाला आणि मग मला कळलं की, ते शिवसेनेचे होते.” असं अजित पवार म्हणाले.

“मी निलेश लंकेंना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की, दादा ते भाजपात जाणार होते. त्यांचं म्हणणं होतं की राष्ट्रवादीने घेतलं नाही, तर आम्ही भाजपात जाऊ…

आम्ही फोडाफोडी करत नाही. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये. काल मी निलेश लंके यांना बोलावून सांगितलं.” असंही अजित पवार पुढे म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment