नोबलच्या 30 लाख रूपयांच्या निधीतून कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही झाल्याने चिंता वाढली आहे. झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाची चिंता वाढली आहे.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगर येथील नोबल मेडिकल फाऊंडेशन व जिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात 20 बेडचा स्वतंत्र,

अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. नोबल मेडिकल फाऊंडेशनच्या 30 लाख रूपयांच्या सामाजिक निधीतून उभारण्यात आलेल्या

या विभागाचे उदघाटन रविवारी दि.12 रोजी सकाळी 11 वाजता आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती नोबल मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. बापूसाहेब कांडेकर यांनी दिली.

जिल्हा शासकीय रूग्णालय कोव्हिड-19 रूग्णालय म्हणून विकसीत केले असले तरी तेथे उपलब्ध बेडची संख्या भविष्यातील वाढत्या रूग्ण संख्येच्या तुलनेत अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचे

त्यांनी सांगितले. यामध्ये डॉ. कांडेकर यांच्यासह विश्‍वस्त डॉ. संगिता कांडेकर, डॉ. पांडुरंग डौले, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. विजय पाटील, डॉ. सुंदर गोरे, डॉ. सुनील बंदिष्टी यांचे योगदान आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment