राहुरी :- नादुरुस्त ट्रकवर पाठीमागून दुसरा ट्रक धडकला. या अपघातात एकजण ठार झाला. शुक्रवारी पहाटे ३ दरम्यान नगर-मनमाड मार्गावरील गुहा परिसरात हा अपघात झाला.
मृताचे नाव सुनील दत्तू हलवर (२६, घोडेगाव चौकी, मालेगाव) आहे. हलवार ट्रकमध्ये मालेगाव येथून कोंबडी खाद्य घेऊन नगरच्या दिशेला चालले होते.
गुहा परिसरातील कृष्णा हाॅटेलजवळ ट्रकचा टायर फुटल्याने मदतीसाठी दुसऱ्या ट्रकची वाट पहात तो थांबला होता. ओळखीचा ट्रक आला.
या ट्रकचे हेडलाईट बंद पडल्याने सुनील मदतीसाठी जवळ गेला. दुरुस्तीचे काम सुरू असतानाच पाठीमागून आलेला ट्रक दुरुस्ती चालू असलेल्या ट्रकवर धडकल्याने सुनीलचा जागीच मृत्यू झाला.
- Explained : विखे-थोरात पुन्हा समोरासमोर ? ZP निवडणुकीत लागणार खऱ्या ताकदीचा कस
- साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत खा. नीलेश लंके यांची भारतीय लष्करासाठी प्रार्थना
- नवीन कार खरेदी करण्यासाठी SBI कडून 15 लाखाचे कर्ज घेतले तर किती रुपयांचा EMI भरावा लागणार?
- IDBI Bank मध्ये 676 पदांची जंम्बो भरती; पात्रताही अशी की अनेकांना भरता येणार अर्ज
- चार्गिंगचं झंझट संपलं… आला 10000 mAh बॅटरीवाला फोन; प्रोसेसरही असा की, चालतो दणादण