अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : पारनेरमधील ‘त्या’ नगरसेवकांच्या पक्षांतरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. अनेक राजकीय घडामोडी, शह-प्रतिशह यावेळी महाराष्ट्राने अनुभवले.
आता त्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. या पत्रामधून त्यांनी औटी हेच पक्ष संपवत असून त्यांना शिवसेनेतून काढा अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक राहणार नाही, असा धोका व्यक्त केला आहे.
निलेश लंके हे सेनेत असताना पक्षसंघटन वाढवत होते. मात्र, त्यांनाही औटी यांनी त्रास दिला असे यात म्हटले आहे. पत्रात म्हटले आहे की, शिवसेनेच्या जोरावर विजय औटी हे आमदार झाले, विधानसभेचे उपाध्यक्ष झाले.
मात्र, त्यांनी शिवसैनिकांना कधीच किंमत दिली नाही. सेनेची एकही शाखा त्यांनी उघडू दिली नाही. शिवसैनिकांऐवजी त्यांनी काँग्रेस व कम्युनिस्ट विचारसरणीच्या लोकांना जवळ केले.
त्यामुळे त्यांची आता पक्षातून हकालपट्टी करा व शिवसेना वाचवा. औटी यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण केले. तेथे उमेदवारी न मिळाल्याने ते सेनेत आले व आमदार झाले.
मात्र त्यांनी शिवसैनिकांना कधीच आपले मानले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी कधीही कार्यक्रम घेतले नाहीत. सेनाप्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता औटी साधे दर्शनाला आले नाहीत.
आपण मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचा साधा फलक लावला नाही. त्यांचे सर्व राजकारण हे स्वार्थी होते असा आरोपही केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews