अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुका येथून प्रसिद्ध होणाऱ्या दोन दैनिकांच्या संपादकांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंतनू सूर्यकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी सौंदाळा सब स्टेशन (तालुका नेवासा ) येथे कार्यरत असून
या दोन्ही संपादकांनी मी बढतीसाठी दिलेल्या अनुभवाचे खोटे कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आशयाची बातमी वृत्तपत्रात छापून आणली
तसेच मी महापारेषण कंपनीत अधिकारी ठेकेदार यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास आल्याचे म्हटले आहे.
तसेच बढतीसाठी शासनास ५ वर्षाच्या प्रमाणपत्राची अट असताना २ वर्षाचे अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याची खोटी बातमी माझ्याशी कुठलाही सपंर्क नसताना
विनाकारण माझ्या विरुद्ध खोटी स्थानिक वृत्त पत्रामध्ये छापून आणली व सोशल मीडिया वर व्हायरल केली याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम ५०० ,५०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews