इंदोरीकरांवरील गुन्हा मागे न घेतल्यास साधू, संत रस्त्यावर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :   घातक रूढी, परंपरांवर आसूड ओढून समाजजागृतीचे काम करणारे निवृत्ती महराज देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा तत्काळ मागे घेण्यात यावा,

अन्यथा सर्व साधु, संत, वारकरी संप्रदायातील लोक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा महंत योगी केशवबाबा चौधरी वीरगावकर यांनी दिला आहे.

वीरगावकर यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना गुरूवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सर्व साधु, संत, कीर्तनकार समाजाला योग्य दिशा देण्याचेच काम करत असतात.

हुंडाबळी, अंधश्रद्धा, तरूणांना लागलेले व्यसन व त्यापासून मुक्ततेसाठी इंदोरीकर महाराज गावोगावी प्रबोधन करत असतात. महाराजांची वाणी रोखठोक आहे.

संत तुकाराम महाराजांनी अभंगातून, संत एकनाथानी भारुडातून, कबिरांनी दोह्यातून, गाडगे महाराजांनी स्वच्छतेतून, तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनातून समाज प्रबोधन केले.

त्यांच्या पावलावर पाऊल टाकून निवृत्ती महाराज आपल्या शैलीत प्रबोधन करत आहेत. काही नतद्रष्ट लोकांनी महाराजांची बदनामी करण्याचा खटाटोप सुरु केला असून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ते तत्काळ मागे घेण्यात यावेत, अन्यथा सर्व साधु- संत, वारकरी सांप्रदायिक व सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment