अहमदनगर :- पाळीव कुत्रा चावल्याप्रकरणी चक्क कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्याविषयी हयगय केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
भिस्तबाग चाैकातील पवननगरमध्ये २ जूलैला ही घटना घडली. याप्रकरणी विजय अर्जुन पिंगळे यांनी शुक्रवारी फिर्याद दिली.
विजय पिंगळे यांची पुतणी दुर्गा संजय पिंगळे हिला रॉट व्हिलर जातीच्या कुत्र्याने चावा घेतला. हा कुत्रा पारधे यांच्या मालकीचा आहे. पोलिसांनी पारधे यांच्या पत्नीविरूध्द गुन्हा दाखल केला.
हलगर्जीपणाने कुत्रा मोकळा सोडून देण्यात आला. तो दुर्गा हिला चावला. तिच्या दुखापतीस जबाबदार धरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरात अगोदरच मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘मृत्यूचे तांडव’ सुरूच ! दहा दिवसात अपघातात पाच बळी ; मागणीकडे दुर्लक्ष; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला किती पगार असायला हवा? अर्ज करा परंतु त्याआधी अटी वाचा
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा
- आधी नियमित व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करा नंतरच पाणीपट्टी दरवाढ करा : अॅड. आगरकर
- काकडी, आद्रक, शिमला मिरची, चवळी, गवार स्थिर