अहमदनगर :- निर्जनस्थळी असलेल्या विहिरीत पडलेल्या तरुणीने दोन दिवस मृत्यूशी झुंज दिली. अखेर मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी दुपारी तरुणीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता परिसरात ही घटना घडली. संबंधित तरुणीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
तपोवन रस्ता परिसरात निर्जनस्थळी असलेल्या एका विहिरीत ही तरुणी आढळून आली. विहिरीत जास्त पाणी नसल्याने तरुणीचे प्राण वाचले. दोन दिवस ही तरुणी मदतीसाठी ओरडत होती. परंतु परिसरात रहदारी नसल्याने तिचा आवाज कुणाला ऐकू आला नाही. शनिवारी सकाळी मात्र एका गृहस्थाने तिचा आवाज ऐकला. त्याने तत्काळ विहिरीकडे धाव घेतली. तरुणीशी संपर्क साधून तिच्या घरच्यांचा मोबाइल नंबर घेत त्यावर फोन केला. मात्र, फोन लागला नाही.
त्यामुळे सद्गृहस्थाने प्रसंगावधान राखत तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क केला. महापालिका अग्निशमन दल माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. विहिरीजवळ जाण्यासाठी रस्ता नव्हता तसेच वििहरीजवळील माती निसटत होती. अखेर विहिरीत सिडी सोडून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित तरुणीची सुखरूप सुटका केली.
- एकेकाळी गजबजलेली ‘ही’ 5 शहरे समुद्रात कशी बुडाली?, त्यांची कहाणी ऐकून अंगावर काटा येईल!
- कसोटीत एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी, पाकिस्तानचा ‘हा’ दिग्गज आहे नंबर 1 वर!
- हृदय, पचन, हाडे आणि…आरोग्यासाठी अमृतसमान आहे ‘ही’ डाळ! फायदे वाचून रोज खाण्यास सुरुवात कराल
- भारतासाठी सर्वाधिक सामने खेळणारे 5 महान कर्णधार, टॉपवरच्या खेळाडूचे रेकॉर्ड आजही कुणीच मोडू शकलं नाही!
- फक्त 2 जिल्हे असलेले देशातील एकमेव राज्य, तुम्हाला माहितेय का या राज्याचं नाव? उत्पन्न, पर्यटन आणि विकासात आहे नंबर 1 वर!