‘ती’ अफवा पसरली अन अनेक जण स्वत:हून क्वारंटाईन झाले

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली आणि ब्राह्मणीकरांची धाकधूक वाढली.

अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले तर अनेकांनी बाहेर फिरायचेच बंद केले. परंतु आता याबाबाबत राहुरीचे तहसिलदार एफ.आर शेख व वैद्यकीय अधिकारी अविनाश जाधव यांनी अद्याप अहवाल आला नाही. अफवांवर विश्वास ठेवून घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

गुरुवारी (दि.९ जुलै) ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेतील क्वारंटाईन केंद्रातून आजारी असलेल्या रुग्णास राहुरी कृषी विद्यापीठ कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

अधिकृत अहवाल प्राप्त नसताना शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर चुकीचा संदेश व्हायरल झाल्याने अनेकांची बोबडीच वळली.

जिल्ह्यातील अनेक नातेवाईकांनी फोनवर ब्राह्मणीतील आपल्या नातेवाईकांकडे सोशल मीडियावरील संदेशाबाबत विचारणा केली. दिवसभर प्रत्येकाचा फोन खनखणले. त्यामुळे विनाकारण सगळ्यांचीच डोकेदुखी झाली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe