राहाता :- तालुक्यातील खडकेवाके येथील cकरण्यासाठी काही दिवसांपूर्वी विषारी पदार्थ सेवन केला होता. उपचार चालू असताना अखेर त्यांचा मृत्यू झाला.
ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे झाली याचे गूढ मात्र गुलदस्त्यात आहे. भास्कर बाजीराव यादव हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रवरा एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते.
सध्या ते एकरुखे येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होते. विष प्राशन करण्याअगोदर त्यांनी एक चिठ्ठी लिहून त्यांच्या मोबाईलमध्ये ठेवली होती.
त्या चिठ्ठीत शाळेतील काही जणांकडून वारंवार त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नमूद केले आहे.