अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. भिंगार शहरातही याचे प्रमाण लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर बचावासाठी भिंगार पोलिसांनी दक्षता घेत चक्क भिंगार पोलीस ठाण्याचाच दरवाजा बंद केला आहे.
ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी टाळण्याकरीता पोलिसांनी बरेच उपाय केले. नागरिकांना समजावून सांगूनही ते ऐकत नसल्याने शेवटी पोलिसांनी भिंगार पोलीस ठाण्याचा दरवाजा बंद केला आहे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. असे असताना बहुतांश नागरिक बेफिकीर भिंगार परिसरामध्ये फिरत असल्याचे दिसत आहे.
कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासन अथक परिश्रम घेत आहेत. प्ररंतु तरीही शहरातील वाढती कोरोना संक्रमणाची संख्या चिंताजनक आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews