अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : त्येकजण चंद्र, ताऱ्यांविषयी वेगवेगळी स्वप्ने पाहतो. अभिनेता सुशांतसिंगने या सर्वांच्या पुढे जाऊन चंद्रावर जमीन खरेदी केली होती. सुशांतने 2018 मध्ये स्वत: चंद्राचा एक तुकडा विकत घेतला.
इंटरनेशनल लूनर लैंड्स रजिस्ट्री कडून ही खरेदी करण्यात आली होती. सुशांतची जमीन चंद्राच्या ‘सी ऑफ मसकोवी’ मध्ये आहे. तुम्हालासुद्धा सुशांतप्रमाणे चंद्रावर जमीन खरेदी करायचे स्वप्न असेल तर ते सत्यात उतरवू शकते,
तेही अगदी कमी किमतीमध्ये. भूमि इंटरनेशनल लूनर लैंड्स रजिस्ट्री च्या ऑफिशियल वेबसाइट https://lunarregistry.com/ वर तुम्हाला यासाठी भेट द्यावी लागेल.
या वेबसाइटला भेट देताच आपल्याला चंद्राच्या बर्याच भागाची नावे सांगितली जातील. यापैकी कोणत्याही क्षेत्रात आपल्याला जमीन खरेदी करता येईल.
आता आपण असा विचार करत असाल की चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी आपल्याला खूप पैशांची आवश्यकता भासेल. परंतु अत्यंत कमी पैशांत तुम्ही हि जमीन खरेदी करू शकणार आहेत.
चंद्रावर एक एकर जमीन खरेदी करण्यासाठी आपल्याला $ 34.25 डॉलर म्हणजेच फक्त 2,568.03 रुपये द्यावे लागतील. परंतु आणखी गोष्ट लक्षात घ्या की,
तुम्ही चंद्रावर जमीन खरेदी करू शकता परंतु आपण तेथे जाऊ शकत नाही आणि तेथे राहू शकत नाही. याशिवाय आंतरराष्ट्रीय करारानुसार आपण त्या जागेवर मालकी हक्क सांगू शकत नाही.
याचे कारण 1967 मध्ये 110 देशांनी ‘The outer space treaty’ हा करार आहे. या करारानुसार चंद्र आणि तारे यांच्यासह इतर कोणत्याही अंतरिक्षातील मालमत्तावर कोणताही देश हक्क सांगू शकत नाही.
या करारावर सही करणार्या या ११० देशांमध्ये भारताचाही समावेश होता. म्हणूनच, चंद्रावर जमीन खरेदी केली तरी यावर दावा करु शकत नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews