अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 : संगमनेर शहरात नामदारांच्या एका जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या साहेबांनी एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यानंतर आज त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हा रिपोर्ट कळताच अधिकार्यांनी आणि स्थानिक व्यक्तीनी फार खबरदारी घेणे सुरू केले आहे.
संगमनेर शहरासह तालुक्यात आज पुन्हा 16 रुग्ण मिळून आले आहेत. यात पंजाबी कॉलनी येथे 63 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरूष, 58 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुणी अशा पाच जणांचा सामावेश आहे.
तर खांडगाव येथे 18 वर्षीय तरुणाचा सामावेश असून नान्नझ येथे 46 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरूषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच नवघर गल्ली येथे 60 वर्षीय पुरूष त संगमनेर तालुक्यातील चिखली येथे 38 वर्षीय महिला देखील कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
हे रिपोर्ट जिल्हा रुग्णालयातून प्राप्त झाले आहेत. तर या व्यतिरिक्त संगमनेरात खाजगी रुग्णालयात पाच स्वॅब पाझिटीव्ह आले असून त्यात विठ्ठलनगर गुंजाळवाडी येथे 40 वर्षीय पुरुष, घुलेवाडी समनापूूर रोड बिरोबा मंदीर या परिसरात 36 वर्षीय तरुण तर महानुभव मळा निमोण येथे एका 50 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
त्याच बरोबर भारत नगर मालदड रोड परिसरात 52 वर्षीय पुरूष तर एकता चौक संगमनेर येथे 49 वर्षीय पुरूषास कोरोनाची बाधा झाली असून आता संगमनेरात एकूण संख्या 223 वर पोहचली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews