अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : संगमनेर तालुक्यातील चिखली येथे वीटभट्टीवर काम करणारी विवाहित महिला शनिवारी रात्री घरात कुणाला काही न सांगता निघून गेली आहे.
या संदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अर्चना अनिल अभंग असे या विवाहितेचे नाव असून ती (वाकडी, ता. श्रीरामपूर) येथे राहणारी आहे.
१५ वर्षांपासून अभंग कुटुंब चिखली येथील अण्णा हासे यांच्या वीटभट्टीवर मजुरीने काम करून तेथेच राहतात. शनिवारी रात्री अर्चना घरात कुणाला काही न सांगता निघून गेली.
कुटुंबांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. संपत पांडुरंग अभंग यांनी शहर पोलिसात खबर दिली. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक वि. रुं. खंडिझोड करीत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews