चिंताजनक ! ‘या’ठिकाणी पोलीस,डॉक्टरांसह सात जणांना कोरोना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : पाथर्डी तालुक्यात काल दिवसभरात नव्याने ७ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात एका डॉक्टरांचा व पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील एक महिला पोलीस, तिसगावमध्ये एक डॉक्टर, शहरातील मौलाना आझाद चौकातील एक महिला व पुणे येथून आलेले चार जण असे एकूण सातजण करोनाबाधित रुग्ण शनिवारी पाथर्डीत आढळून आले.

तर तालुक्यातील सुमारे 100 संशयित स्राव तपासणी करण्यासाठी पाठविले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली.

तालुक्यातील तिसगाव येथील मिरी रोडवर असणार्‍या एका हॉस्पिटलच्या 33 वर्षीय डॉक्टरला देखील कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर तालुक्यातील पिंपळगाव टप्पा येथील 26 वर्षीय महिला नाशिक पोलिसाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे.

कोल्हार येथे काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभात सोनई येथील काही पाहुणे आले होते. या पाहुण्यांमधील काहींचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने या पाहुण्यांच्या संपर्कातील काही लोकांचे स्राव तपासणीसाठी घेतले आहेत. तसेच पिंपळगाव टप्पा येथील महिला पोलिसांच्या संपर्कात आलेल्या तीन जणांचे शहरातील महिलेच्या संपर्कात आलेल्या

घरातील 26 जणांचे तसेच शिक्षक कॉलनीत निघालेल्या पोलिसाच्या संपर्कातील काहीजण असे मिळून सुमारे 100 स्राव तपासणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविल्याची माहिती डॉ. भगवान दराडे यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment