अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून कुणालाही भेटायला वेळ देत नाहीत. महाराष्ट्रात साधू संतांचे , मंदिरासंदर्भात अनेक प्रश्न आहेत पण ते सोडवायला त्यांना वेळ नाही.
शिवसेना हिंदुत्ववादी होती. आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे दिसत आहे? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी उपस्थित केला.

भोसले यांनी रविवारी निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, राज्यात दारू दुकानांपासून सर्व उद्योग, व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. परंतू मंदिरे बंद असल्याने हरी लॉक आहे.
महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांतील मंदिरे केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करून भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली. श्रावण महिना सुरू होत आहे.
त्यामुळे राज्यातील मंदिरे देखील खुली करावीत अशी आमची मागणी आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून कुणालाही भेटायला वेळ देत नाहीत. त्यामुळे आम्ही या मागणीसाठी राज्यपालांना भेटलो, असेही त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews