अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे , नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही कोरोनाने शिरकाव केला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक आता कोरोनाने शिकार झाले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या सात ते आठ कर्मचारी व या विभागात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून अन्य सात ते आठ कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लक्षणे आढळून आली.
त्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचा रिपोर्ट अद्यपि आलेला नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews