अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : आधी कोरोना आणि आता निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता बोगस बियाणांमुळे सोयाबीन न उगवल्याने शेतकरी हताश झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यातील 23 बियाणे कंपन्यांवर विविध ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केलेले आहेत. अशी माहिती कृषीचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी दिली.
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना बोगस बियाणे पुरवणार्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून
शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी 10 जुलै रोजी कृषी आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी कृषी आयुक्त कार्यालयाकडून लेखी पत्र देण्यात आले की, नगर जिल्ह्यात 519 बोगस बियाणे उगवणीच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी तालुका तक्रार निवारण समितीमार्फत 398 तक्रारींची पाहणी करण्यात आली.
तसेच राज्यात एकूण 53 हजार 929 तक्रारी प्राप्त झाल्या असून 34 हजार 845 तक्रारींची तालुका समितीमार्फत पाहणी करण्यात आलेली आहे.
आतापर्यंत १ हजार 455 शेतकर्यांना संबंधित कंपन्यांकडून भरपाई मिळवून दिलेली असून उर्वरित पात्र शेतकर्यांनाही लवकरच नुकसान भरपाई देण्याचे निर्देश संबंधित कंपन्यांना दिलेले आहेत.
याप्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी, आझाद फाउंडेशनचे सागर कुंभार आदिंसह नेवासा तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews