अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात महिनाभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी मािहती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डाॅ. विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. याबाबत गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेतली.
या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असताना केवळ भूसंपादनाच्या कारणामुळे हे काम सुरू होऊ शकत नसल्याची बाब खासदार डाॅ. विखे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.
उड्डाणपुलाच्या कामासाठी काही ठिकाणी बाकी असलेल्या भूसंपादनाचा कोणताही अडथळा कामात येऊ न देता या कामाला सुरुवात करून, राहिलेले भूसंपादन सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे डाॅ. विखे यांनी सांगितले.
नगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता.लोकसभा निवडणुकीच्या निमिताने या कामाला प्राधान्य देऊन मार्गी लावण्याचा शब्द आपण दिला होता. त्याची प्रत्यक्ष सुरुवात आता झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घेतलेले सकारात्मक निर्णय नगरकरांना दिलासा देणारे असल्याचे विखे यांनी सांगितले.
- प्रवरेतील दूषित पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले पाथरे गावात प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांची भेट
- कोरठण खंडोबा गडावर उसळला जनसागर
- २ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव
- पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…
- विमानाचं मायलेज नेमकं किती असत बरं ? वाचा ‘हि’ रंजक माहिती..