अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : श्रीगोंदा शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलीस यांची संयुक्त कामगिरी सुरु आहे. याठिकाणी नियमांची कडक अंमलबजावणी केली जात आहे.
याच कारवाई दरम्यान पोलिसांनी पुण्याच्या पोलीस निरीक्षकाच्या मुलास विनामास्क फिरताना पकडले. त्याने त्याच्या वडिलांना माहिती दिली.
त्याच्या पोलीस निरीक्षक असणाऱ्या वडिलांनी त्याला सोडण्याची विनंती श्रीगोंदे पोलिसांना केली. परंतु त्यांचे म्हणणे न ऐकता पोलिस निरीक्षक जाधव यांनी त्याकडून २०० रू. दंड भरून घेतल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
या बाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा शहरात पोलिस महसूल व नगरपालिका यांनी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांविरोधात संयुक्त मोहीम उभारली असताना या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील एका पोलिस निरीक्षकांच्या मुलाला विना मास्क प्रवास करत
असताना पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पकडले असता मुलाने आपल्या पोलिस असलेल्या वडिलांना फोन करून हकिकत सांगितली असता त्यांनी श्रीगोंदा पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना फोन करून विचारणा करत व मुलाला विना दंड सोडण्याची विनंती केली.
मात्र पोलिस निरीक्षक जाधव यांनी त्यांची विनंती धुडकाव पोलिस निरीक्षकांच्या मुलाकडून २०० रू. दंड वसूल केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews