झाडे लावा…क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकणारा तो अधिकारी निलंबित

Published on -

अहमदनगर :- ‘झाडे लावा…क्वार्टर मिळवा’ अशी वादग्रस्त पोस्ट टाकणारे महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिले आहेत.

महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक खासगी Whatsapp ग्रुप आहे. या ग्रुपवर देशमुख यांनी वादग्रस्त पोस्ट टाकली. ‘उन्हाळ्यात एक झाड लावा, ते वाढवा आणि हिवाळ्यात माझ्याकडून एक क्वार्टर मिळवा’ अशी ही पोस्ट होती.

यामध्ये वृक्षारोपण करणाऱ्या मुकादमांना प्राधान्य असेल, असेही म्हटले. ग्रुपमधील काहींनी या पोस्टचे स्क्रीन शॉट घेऊन अन्य ग्रुपवर पोस्ट केले. त्यामुळे शहरभर या अनोख्या योजनेची चर्चा झाली;

मात्र, वृक्षारोपणाच्या बदल्यात दारूचे आमिष दाखविण्याच्या प्रकाराला कर्मचारी संघटनेने आक्षेप घेतला. महापालिका कर्मचारी युनियनने आयुक्तांकडे तक्रार केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe