धक्कादायक : कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेची गर्भधारणा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- दीड वर्षांपूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करूनही महिलेला गर्भधारणा झाल्याचा व संबंधित कुटुंबास त्यामुळे त्रास सहन करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे.

तसेच या संदर्भात संबंधित डॉक्टरांना विचारणा केल्यानंतर त्यांनी त्या कुटुंबास अरेरावीची भाषा केल्याचाही प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

या संदर्भात सतीश मोटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे एक निवेदन दिले आहे. यात असे म्हटले आहे.

निवेदनात मोटे यांनी म्हटले की, सप्टेंबर 2018 मध्ये त्यांच्या पत्नीची वडाळा बहिरोबा येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली.

त्यानंतर याच दवाखान्यात पैसे भरून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाही करून घेतली. दि.1 जून 2020 रोजी मोटे यांच्या पत्नीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने

तपासणी व उपचारासाठी त्यांना याच दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मुतखडा झाल्याचे निदान केले. त्यांच्या पत्नीला संपूर्ण दिवस आणि रात्रभर या रुग्णालयात दाखल करून गोळ्या,

इंजेक्शन व सलाईनचा मारा करूनही दुखणे कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने त्यांनी नेवासा फाटा येथील एका खासगी दवाखान्यात धाव घेतली.

या दवाखान्याच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यावर गर्भधारणेचे निदान केल्यावर या उभयतांना मोठा धक्काच बसला. त्यांनी अधिक खात्रीसाठी श्रीरामपूर येथील एका तपासणी केंद्रातून सोनोग्राफी केल्यानंतर गर्भ खराब झालेला

असून सेप्टिक होऊन त्याचे विष शरिरात सर्वत्र पसरण्याचा धोका लक्षात आणून दिल्यानंतर अहमदनगर येथील एका प्रथितयश डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन हा खराब झालेला गर्भ तातडीने काढून टाकावा लागल्याचे मोटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment