अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर मधील एका व्यक्तीने पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील श्रीराम लॉजमध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. नंदू बेबी अंधारे (वय 39, रा. शेवगाव जि. अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी: नंदू अंधारे हे १० जुलैला शेवगाव येथून सिंहगड रस्ता परिसरातील श्रीराम लॉज येथे वास्तव्यास आले होते.
सोमवारी रात्री ते जेवण करून रुममध्ये गेले. मंगळवारी सकाळी साफसफाई करणार्या मुलाने त्यांच्या रूमचा दरवाजा बर्याच वेळ ठोठावूनही आतून काही प्रतिसाद आला नाही.
दरम्यान लॉज चालकाने खिडकीतून डोकावले असता त्यांना अंधारे यांनी पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांना याबाबत खबर देण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews