संपूर्ण नगर शहर लॉकडाऊन करा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. मध्यंतरीच्या कालावधीत लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली गेल्याने बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

परिणाची अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाची वाढती संख्या रोखण्यासाठी नागरिकांच्या संपर्काची साखळी तुटणे आवश्यक आहे.

यासाठी नगर शहरात पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करावे, अशी मागणी दीनदयाळ परिवाराच्यावतीने वसंत लोढा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात दीनदयाळ परिवाराच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल द्वारे पाठवण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीमुळे सर्वांवर मोठे संकट आले आहे.

मार्च महिन्यात करण्यात आलेले लॉकडाऊनमध्ये जून महिन्यात देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे सर्वत्र दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत. अहमदनगर शहरात सुद्धा सर्व बाजारपेठ्या उघडून दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत.

इतर जिल्ह्यातून नगर मध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्याही वाढली आहे. अनेक नागरिक बिना पास सर्रास जिल्हाबंदीचा नियम तोडून नगरमध्ये दररोज येत आहेत. जिल्हा हद्दीवर पोलीस येणाऱ्या नागरिकांची कोणतीही तपासणी करत नाहीत.

त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे आता जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत आहे.

शेकडोच्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. दररोज कंटेनमेंट झोनमध्ये वाढ होत आहे. जेव्हा कमी संख्येने कोरोना बाधित आढळत होते, तेव्हा शहरात कडक लॉकडाऊन होते.

आता रुग्णांची संख्या शेकडोंनी वाढत असतांना लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्वरित नगरच्या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

राज्यात इतर जिल्ह्यात पुन्हा केलेल्या लॉकडाऊनप्रमाणे नगर शहरातही तातडीने पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनास द्यावे. नगरमध्ये लगतच्या पुणे, आणि औरंगाबादप्रमाणे कोरोना रुग्णांची संख्या व्हाढणार नाही,

अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे व्यक्त करण्या आली आहे. निवेदनावर बापू ठाणगे, प्रा. सुनील पंडित, सुहास मुळे, प्रा. मधुसूदन मुळे, बाळासाहेब भुजबळ,

अनिल शर्मा, हरिभाऊ डोळसे, गौतम कराळे, बाळासाहेब खताडे, सदाभाऊ शिंदे, सोमनाथ चिंतामणी, सचिन पारखी आदींच्या सह्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment