अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कर्जत शहरात कोरोनाचा अखेरीस शिरकाव झाला असून, हनुमान गल्लीतील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हा रिपोर्ट खाजगी लॅबचा असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप पुंड यांनी दिली.
संत श्री गोदड महाराजांच्या यात्रेसाठी तीन दिवस कर्जत शहर लॉकडाऊन केलेले असताना, या तीन दिवसांच्या पूर्वसंध्येलाच अचानक कर्जत शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने मोठी खळबळ माजली आहे.
गेली अनेक दिवस सुरक्षित असलेल्या कर्जत शहरात कोरोनाने अखेरीस शिरकाव केल्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. कर्जत तालुक्याची रुग्ण संख्या आता 16 झाली असून, या अगोदरचे सर्व रुग्ण बरे झालेले आहेत.
कर्जत नगर पंचायतीने शहरातील हनुमानगल्ली परिसर कोटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून सील केला आहे. तसेच या गल्लीत जाणारे विविध रस्ते पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत.
परिसरातील विविध घरात आरोग्य विभागा कडून तपासणी करत सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. येथे सर्व प्रशासकीय यंत्रणा आवश्यक ती खबरदारी घेत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews