अहमदनगर ब्रेकिंग : कारमध्ये तरुणीवर बलात्कार

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील आखोणी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर कारमध्ये बलात्कार केला. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एका २५ वर्षीय तरुणीला पांढरीपूल येथून कारमध्ये बसवले आणि काष्टी येथे उतरून देऊ, असे सांगितले.

गाडीतील निवृत्ती सुभाष ढवळे, कारचालक आणि मेजर (दोघांची नावे माहित नाहीत) यांनी या तरुणीस काष्टी येथे उतरु न देता तिला कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील निर्जन आडरानात नेले,

आणि आरोपी निवृत्ती सुभाष ढवळे याने बळजबरीने तिच्यावर संभोग केला. कारचालक आणि मेजर यांनी अत्याचाराचा विरोध न करता सहाय्य केले.

दरम्यान, काल या पिडीत तरुणीने याप्रकरणी कर्जत पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार निवृत्ती सुभाष ढवळे, कार चालक आणि मेजर अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जत तिभागाचे डिवायएसपी संजय सातव, पो. नि. गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. ढवळे याला अटक करण्यात आली. डिवायएसपी सातव हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment