अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- गेल्या वर्षी जिल्हातील बहुतेक साखर कारखाने बंद होते. त्यामुळे कारखान्यांना कर्ज कसे द्यायचे, असा प्रश्न होता. अशा परिस्थितीत जिल्हा बँक संचालक मंडळाने मार्ग काढत साखर कारखान्यांना आधार देण्याचे काम केले आहे.
जिल्हा बँक ही साखर कारखान्यांसाठी आहे, असे चित्र होते. बँकेने गेल्या पाच वर्षांत गायी खरेदी, घर बांधणी आणि शैक्षणिक कर्ज देण्याचे धोरण घेतले. त्यामुळे ही बँक सामान्य माणसाची जिव्हाळ्याची बनली आहे.
जिल्हा बँकेचे अधिकारी, सोसायटीच्या सचिवांंनी अहोरात्र काम केल्यामुळे बँकेला एक हजार पाचशे कोटी पैकी १ हजार तीनशे कोटींची कर्जमाफी आली आहे.
लवकरच दोनशे कोटींची कर्जमाफी येईल, अशी माहिती माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिलीय. ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या वैभवशाली वाटचालीत श्रीगोंदेकरांचे योगदान मोठे आहे.
बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी ऊस बिलातून शेतकर्यांचे पीककर्ज कपात न करण्याचे धोरण घेतल्यामुळे श्रीगोंद्यातील ३८ हजार शेतकर्यांना २६४ कोटींची कर्जमाफी झाली.
त्यामुळे त्यात श्रीगोंदे तालुका अग्रेसर ठरला. जिल्हा बँकेच्या श्रीगोंदे शहर शाखेत सचिव, सोसायटी प्रतिनिधींसाठी हॉलचे उद्घाटन माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्ष गायकर म्हणाले की, ज्या शेतकर्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज थकले आहे, अशा शेतकर्यांना पीककर्ज देण्याचे धोरण घेतले आहे. जुन्या थकबाकीदारांसाठभ लवकरच एकरकमी फेड योजना लवकरच आणणार आहे.
दत्तात्रय पानसरे म्हणाले, की माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आ. बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत काम करताना
श्रीगोंद्यातील शेतकर्यांना जास्तीत कर्ज मिळवून देण्यासाठी काम केले. आता शेतकर्यांच्या मुलांना देश-विदेशात शिक्षण घेण्यासाठी १० ते २५ लाखांचे कर्ज देण्याची गरज आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews