अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी, अनेक वास्तव समाजासमोर आले. यात अनेक चांगले तर अनेक मनाचा ठाव घेणारे अनुभव होते.
या लॉकडाउनच्या काळामध्ये परिस्थितीला शरण जाऊन अनेकांनी आपले जीवन संपवल्याच्या घटनाही घडल्या. गोदावरीच्या तिराकाठी भौगोलिकदृष्ट्या
सक्षम असलेल्या कोपरगाव आणि राहाता तालुक्यात लॉकडाऊनच्या कालावधीत आतापर्यंत 113 व्यक्तींनी आत्महत्या केल्या असून त्यामध्ये पुरुषांची संख्या 78 तर महिलांची संख्या 35 आहे.
यामध्ये 24 जणांनी फाशी घेतली आहे तर 13 जणांनी पाण्यात उडी मारून तसेच अन्यप्रकारे 76 जणांनी आत्महत्या केल्या असून ही युवा पिढीच्यादृष्टीने मोठी चिंताजनक बाब आहे.
सधन तालुक्यातील युवकांनी आत्महत्या करण्याऐवजी समाजात एक आदर्श जीवन जगून नव्या पिढीला संदेश द्यावा असे आवाहन शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी केले
असून संकट कितीही येऊ द्या लढा देण्यास आम्ही तयार आहोत हे सिद्ध करून दाखवणे हीच खरी काळाची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews