अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहिर झाला असून, तक्षिला स्कूलचा निकाल 100 टक्के लागला आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. 24 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवले असून,
गरिमा गोपलानी हिने 99 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. शाळेत प्रथम- गरिमा गोपलानी (99 टक्के), द्वितीय- दीपक दास (97.80 टक्के), तृतीय- तनिष कटारीया (96.40 टक्के),
चौथा- पार्थ कदम (96 टक्के), पाचवी- मेघा आसनानी (95 टक्के) येण्याचा बहुमान पटकाविला. गणित विषयात दीपक दास, गरिमा गोपलानी व तनिष कटारीया यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवले.
आयटी मध्ये दीपक दास, गरिमा गोपलानी, इशा गुंदेचा, निष्ठा बोरा, सानिका म्याना, तनिष कटारिया, विधी गोपलानी तसेच समाजशास्त्र मध्ये गरिमा गोपलानी या विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर गुण मिळवले.
इंग्रजी विषयात अमोरा वधवा, अनिष्का चड्डा, हिंदी मध्ये शशांक कंक, विज्ञान मध्ये गरिमा गोपलानी यांनी शंभर पैकी 99 गुण मिळवले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना तक्षिला स्कूलच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे, समन्वयक तन्वीर खान,
श्वेता शिरसाठ, नीरज व्होरा, ओंकार सिंग, बाळासाहेब लिमकर, तारा बच्चा, कल्पना गवारे, प्रज्ञा क्षीरसागर, किर्ती जाधव, अश्विनी नन्नवरे, किरण जोशी, संजीवनी रासकर, शुभम गोहर यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. गुणवत्ता प्राप्त करणार्या या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-