अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :- अकोले तालुक्यात कोरोनाने आपले अर्धशतक पुर्ण केले आहे व तालुक्यातील 30 वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे.
हा तरुण चाकण येथे नोकरी करीत होता. तो अकोले तालुक्यातील त्याच्या गावी ये-जा करीत असताना त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी तो घरी आला असता त्यास श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे त्याने एका स्थानिक डॉक्टरांशी बोलुन उपचार घेतले होते मात्र तरी देखील त्यास बरे वाटले नाही.
दरम्यान त्या डॉक्टरांनी त्यास संगमनेर येथे पाठविले असता एका खाजगी तपासणीत त्याचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. हे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यास फार त्रास होऊ लागला आणि त्याने आज दुपारी अखेरचा श्वास घेतला.
आता अकोले तालुक्यात कोरोनाने अर्धशतक मारले आहे. तर आजवर तालुक्यात दोन बळी गेले आहेत. त्यामुळे शहरवासियांनी अकोले शहर सोमवारपर्यंत बंद ठेवले आहे.
- अकोले तालुक्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/tag/akole/
- फेसबुकवर वाचा तुमच्या तालुक्यातील बातम्या लाईक करा अकोले फेसबुक पेज https://www.facebook.com/Ahmednagarlive24Akole/
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]