स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नागोबाची वाडी, खर्डा परिसरात राहणारी एक ३५ वर्षांची तरुण महिला तिच्या घरात स्वयंपाक करत असताना आठच्या सुमारास हनुमंता रामा गोपालघरे [रा. नागोबाची वाडी,

खर्डा] हा अनाधिकाराने दारु पिवून येऊन या महिलेच्या घरात घुसला. ‘वहिनी मी किती दिवसापासून तुझ्यामागे लागून प्रेमाची मागणी करतो, तू काहीच का बोलत नाही.

मी तुला यापूर्वी येवून याबाबत बऱ्याचवेळा बोललो. पण तू काहीच प्रतिसाद दिला नाही’, असे म्हणून स्वयंपाक करत असलेल्या महिलेला धरून लज्जा उत्पन्न होईल,

असे वर्तन करून तिचा विनयभंग केला. ‘तू मला फार आवडते’, असे म्हणत महिलेने प्रतिकार करताच कोणास काही सांगितले तर तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे ठार मारील,

अशी घमकी दिली. पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार जामखेड पोलिसात हनुमंत रामा गोपालघरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ४५२, ५०४, ५०६ अनुसूचित जाती जमाती

कायदा कलम ३ [१] [डब्ल्यू] [१] [२] प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. डिवायएसपी सातव, पोनि पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. डिवायएसपी सातव हे पुढील तपास करीत आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment