अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-शेवगाव तालुक्यातल्या ढोरजळगाव येथील देविदास रामदास माळी (वय ३५) याने गळफास घेत इहलोकीची जीवनयात्रा संपविली.
आर्थिक परिस्थितीमुळे उदभवलेली उपासमारीची परिस्थिती यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे रिकामधंदा नसल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची बनली, त्यामुळे उपासमारीची वेळ आल्याने
काल बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घरातील सर्व व्यक्ती घराबाहेर गेल्यानंतर देवीदाने आत्महत्येचा प्रत्यन केला. दरम्यान, माळी याला उपचारासाठी ढोरजळगावातील खाजगी दवाखान्यात दाखल केले.
मात्र त्याची प्रकृती त्याला उपचारार्थ शेवगावला नेण्यात आले. परंतु रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात त्याची आई, पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.
त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात सोशल डिस्टन्सिंग पाळत ढोरा नदीच्या किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]