अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :-मागील दोन तीन दिवसांपासून कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरूच आहेत. नगर शहरात संपूर्ण संचारबंदी सुरू आहे.
मात्र तरीदेखील कोरोना रुग्णांच्या संख्यावाढीसंदर्भात नुसत्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर जर कोणी चुकीचे संदेश पसरविल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल होतील,
असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे. ते म्हणाले, कोरोना प्रतिबंधाचा लढा सुरू आहे. मात्र जनतेत संभ्रम होईल,
या उद्देशाने काही लोक संदेश प्रसारित करीत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वांनीच संयम पाळायला हवा. अन्यथा अशा व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]