अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे.
पाथर्डी तालुक्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल ४२ कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये आगासखांड ०२, कोल्हुबाई कोल्हार ११, तिसगाव ०३,
त्रिभुवनवाडी ०४, खाटीक गल्ली पाथर्डी २२ अशा एकूण ४२ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पाथर्डी शहर २३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात
येणार असून या काळात फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहणार असल्याचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]