अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- बँक ऑफ महाराष्ट्रने किमान शिल्लक रक्कम मर्यादा वाढविली बँक ऑफ महाराष्ट्रच्या मेट्रो आणि शहरी भागातील बचत खातेधारकांना आता त्यांच्या खात्यात किमान मासिक सरासरी 2 हजार रुपये शिल्लक ठेवावी लागणार आहे.
याआधी १५०० ची मर्यादा होती. आता जर 2000 रुपये न ठेवल्यास तुम्हाला दंड भरावा लागेल. जर तेव्हढी रक्कम नसेल तर शहरी शाखांमध्ये ७५ रु.
अर्ध-शहरी शाखांमध्ये ५० रु. आणि ग्रामीण शाखांमध्ये दरमहा २० रुपये शुल्क आकारले जाईल. चालू खातेधारकांसाठी मासिक सरासरी शिल्लक मर्यादा कमीत कमी 5000 रुपये करण्यात आली आहे.
२) पैसे काढण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल? एटीएम प्रमाणे आपल्याला आपल्या गृह शाखा किंवा इतर कोणत्याही शाखेतून एका महिन्यात 3 वेळा पैसे काढण्यासाठी विनामूल्य व्यवहार करण्यास परवानगी असेल.
या वर तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 100 रुपये दंड भरावा लागेल. ३) अॅक्सिस बँकेने नवीन शुल्क सुरू केले – अॅक्सिस बँक खातेदारांना प्रति ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लीयरिंग सिस्टम) व्यवहारासाठी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल,
जे आधी शून्य होते. तसेच लॉकरच्या ऍक्सेसच्या एका विशिष्ट मर्यादेपेक्षा वाढीव याच्यावर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
१०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांच्या रोख हाताळणीवर प्रति बंडल १०० रुपये (१००० च्या नोट्स) आकारण्याची घोषणा देखील केली आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे.
४) कोटक महिंद्रा बँके खातेधारकांसाठी महत्वाचे – कोटक महिंद्रा बँकेत बचत आणि कॉर्पोरेट वेतन खातेधारकांना दरमहा 5 विनामूल्य एटीएम व्यवहारानंतर शुल्क भरावे लागेल.
मोफत व्यवहारानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारासाठी २० रुपये आणि बिना पैशाच्या व्यवहारासाठी ८.५ रु. प्रति व्यवहार चार्ज आकारला जाणार आहे.
कोटक महिंद्रा बँकेच्या खातेदारांना खाते श्रेणीनुसार सरासरी किमान शिल्लक रक्कम न राखल्याबद्दलही दंड भरावा लागेल. याशिवाय महिन्यातून 3 वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु प्रत्येक चौथ्या व्यवहारासाठी प्रत्येक व्यवहारासाठी 100 रुपये शुल्क आकारले जाईल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]