शिर्डी :- आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आपल्या पक्षात किती आमदार राहतील याची आधी दक्षता घ्यावी, असा प्रतिटोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार चांगले काम करत आहे. जनतेचा विश्वास सरकारवर आहे. राज्यात लोकसभेला मिळालेला जनाधार विधानसभा निवडणुकीतही कायम राहील,
असा विश्वास व्यक्त करतानाच मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा यापेक्षा महायुतीचाच होईल, असा दावाही त्यांनी केला.
शिर्डी येथे मंत्री विखे यांनी गुरूपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर साई समाधीचे दर्शन घेतले. पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशातील आणि राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली.
राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठे यश मिळाले. सरकारचे चांगले काम सुरू असल्यामुळेच जनतेने महायुतीला पाठबळ दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत यापेक्षा वेगळे निकाल नसेल, २२० जागांचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
- बिल देण्याच्या कारणावरून साकूरमध्ये हाणामारी ; १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, सकल हिंदू समाजाचे गावबंद आंदोलन
- ‘आध्यात्मिक शक्तीपीठ म्हणून भगवानगडाची ओळख’ ; भगवान गडावर भाविकांची अलोट गर्दी
- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘मृत्यूचे तांडव’ सुरूच ! दहा दिवसात अपघातात पाच बळी ; मागणीकडे दुर्लक्ष; नागरिकांचा आक्रमक पवित्रा
- पर्सनल लोन घेण्यासाठी तुम्हाला किती पगार असायला हवा? अर्ज करा परंतु त्याआधी अटी वाचा
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा