अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेलीत आणखी सहा कर्मचार्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.धक्कादायक म्हणजे तपासणीसाठी स्राव दिल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी हा अहवाल आला आहे.
मागील आठवड्यात महापालिकेतील अधिकारी व चार कर्मचारी बाधित आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही कर्मचार्यांनी महापालिकेच्या रामकरण सारडा वसतिगृह येथील स्राव संकलन केंद्रात कोरोना तपासणीसाठी सोमवारी (दि. 13) स्राव दिले होते.

त्यानंतर या कर्मचार्यांना घरी पाठविण्यात आले. स्राव दिल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी त्यांचा अहवाल आला असून, यातील सहा कर्मचार्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्राव दिलेल्या सर्व कर्मचार्यांना विलगीकरण कक्षात न ठेवता घरी पाठविण्यात आले होते.
अहवाल येण्यास विलंब झाला. थेट सहाव्या दिवशी त्यांचा अहवाल आला. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांमध्ये खळबळ उडाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]