अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी 36 वर्षीय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली होती, आज याचा उपचार घेत असताना हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.
सदर कर्मचारी काही दिवसांपूर्वी भाळवणी येथील जिल्हा परिषद कर्मचारी व तेथीलच ग्रामसेवक कोरनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले होते त्यांच्या संपर्कात आल्यामुळे या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती मात्र ही कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती
दरम्यान दोन दिवसापूर्वी या व्यक्तीला अस्वस्थ वाटत होते व त्रास होत असल्याने नगर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यात त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]