महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले …तर लॉकडाऊन करावे लागेल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ही संख्या कमी करून शून्यावर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नसून

व्यापारी व जनतेने नियमांचे पालन करत कोरोनाची साखळी तोडावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी शॅम्प्रोच्या आवारात आयोजित पत्रकार परिषदेत केले.

आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, डॉ. हर्षल तांबे यावेळी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, प्रशासनाने चांगले काम केले असून या पुढे अधिक सतर्कतेने ते काम करतील. जनतेने स्वयंशिस्त पाळावी. व्यापारी वर्गानेही नियमांचे पालन करावे.

लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांत नियमांचे पालन करावे. प्रशासन व जनता यांच्या सहभागातून कोरोनाची साखळी तुटेल. नियमांचे उल्लंघन झाल्यास लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा मंत्री थोरात यांनी दिला.

संगमनेरमध्ये ५०० बेडची व्यवस्था करण्यात आली. घुलेवाडी येथील कोविड केंद्रात रुग्णाची क्षमता वाढवली. शहरातील कॉटेज रुग्णालय, मौलाना आझाद मंगल कार्यालयातही रुग्णांसाठी पूर्ण क्षमतेने व्यवस्था करण्यात आली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment