दूध आंदोलनास सुरुवात; ‘ह्या’ ठिकाणी दगडांना दुग्धाभिषेक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

त्यामुळे दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.

दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा,

या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. डॉ. अजित नवले, दशरथ सावंत आदींच्या उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment