आ. भाऊसाहेब कांबळे कुटुंबात काम करणाऱ्या तरुणाच्या खून प्रकरणी एका आरोपीस अटक

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर :- शहरातील आ. भाऊसाहेव कांबळे यांचे चिरंजीव संदीप कांबळे यांच्या भारत गॅस कंपनीत कामास असलेला कामगार सुरेश बळवंत वाघमारे, वय ३८ याचा दगडाने ठेचून खून झाला होता.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा राबवून खुनातील एक आरोपी हेमंत उर्फ दत्ता किशोर शेळके, वय ३२, रा. संगमनेर रोड, शंकरभुवन, वॉर्ड नं. ३, श्रीरामपूर याला पोलिसांनी अटक केली असून दुसरा एक फरार आरोपी त्याचा कसून शोध सुरु आहे.

यासंबंधी पोनि बहिरट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेमंत उर्फ दत्ता शेळके या आरोपीस अटक केल्याच्या माहितीस दुजोरा दिला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांनी मयताची पत्नी सौ. निर्मला सुरेश वाघमारे, रा. मोरगे मळा, सूतगिरणी रोड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२, २०१ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी वेगाने तपास करत संगमनेर रोडवरील पुनम हॉटेल शेजारी देशी दारुच्या दुकानात मयत वाघमारे, काळे व गोरे हे बरोबरच दारू पिल्याचे सीसीटीव्ही कॅमे- यातील फुटेजमध्ये दिसून आले.

याचवेळी अन्य दोन शेळके व गांगुर्डे हेही या ठिकाणी दारू पिले. यावेळी वाघमारे बरोबर यातील काहींची शाब्दीक खडाजंगी झाली.

त्यानंतर वाघमारे येथुन गेल्यानंतर त्याच्या मागे दोघे जण गेल्याचे काही तेथे उपस्थित असलेल्या साक्षीदारांकडून माहिती मिळाल्याने याचा पोनि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि समाधान पाटील, पो. कर्मचारी पोकळे, जाधव, गोसावी, दिघे, राशिनकर, कारखिले, दुधाडे, यांनी बारकाईने तपास करत आरोपी हेमंत उर्फ दत्ता किशोर शेळके याला पकडले.

त्याचा गुन्ह्यात सहभाग आढळून आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याने त्याला पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पुढील तपास स्वतः पोनि बहिरट हे करीत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज मुळे खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा चोवीस तासात तपास लावण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे. इतर नेमके किती आरोपी व फरार आरोपी यांचा कसून शोध सुरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment